Friday, 14 October 2016

*मैत्री*

तुटलेल्या मनाचा व हृदयाचा आधार म्हणजे मैत्री
मनाचा व हृदयाचा आधार म्हणजे मैत्री
रक्ताच्या नात्यापालिकडच्या रेशिमगाठ म्हणजे मैत्री
कडक उन्हात एक वाऱ्याचा शीतल स्पर्श म्हणजे मैत्री
हजारो रस्त्यातील एक ओळखीची वाट म्हणजे मैत्री
पानावलेल्या नयनातील अश्रुंची धार म्हणजे मैत्री
जीवन मी तर आत्मा म्हणजे मैत्री
करुणा संस्कार छंद माया याचं मिश्रण म्हणजे मैत्री

Saturday, 5 March 2016

*प्रेम वेडा*

प्रत्येक क्षणी आठवणींच काहुर मनी पेठून उटत आणि घेऊवुव जात भुतकाळात. जिथल्या गोड तिकट आठवणींना उजागर करून मनातील भावनांना आकसुन सोडते. त्या आठवणींचा गोडवा गात असताना तिकट अनुभूती मनाच्या खोल गाभाऱ्यात जावुन गोड अनुभवानांही बेचव करतो. पण भुतकाळात रमताना वर्तमानात होणाऱ्या त्यांच्या भासांना रोखताना जो त्रास होतो त्याची चिंता भविष्यावर पडेल का ?? याच प्रशनरूपी गोंधळ नसा नसात माजतो आणि त्या वक्तीच्या विरहाचा वारा नसानसातुन हृदयापर्यंत येवुन धडकतो.
अश्या व्यक्तींबद्दलच प्रेम एका ढेकणासारख हृदयाला चिकटलेल असत. हा प्रेमाचा ढेकुण किड्याला विलग करण्याचे सामर्थ्य स्वत:मधे नसते. पण त्या अनुभुती कालस्मर्णीय असतात.
या अनुभुतींची साद टिकवणे प्रत्येक मनुष्य प्राणीस जमलेच नाही. शारिरीक आकर्षण व एकट्या पणाची भीती माणसास बोचत असते. तो नेहमी दुसऱ्या संधींचा किंवा जुळवाजुळवीचे समिकरण वापरतो आणि एक मुखवटा काडुन दुसरा मुखवटा बसवतो. माझ्या मते असे लोक वंशवेल, स्वार्थ,अहंकारा पोटी समाजात वावरत असतील.असे लोक संसाराचा गाडा ढकलताना जुन्या आठवणी सोबत घेऊन आपल्या साथीला अप्रत्यक्षपणे धोका देन्याचे काम करतात. आपल मन कृती विचार प्रेम हे स्थिर राहायला हवे.
समाजामधे असेही असतात जे प्रत्येक ठीकाणी प्रेत्येक वेळी विशिष्ट व्यक्तीसाठी थांबलेली असतात समोरच्या व्यक्तीचा नाकार किंवा काही अडचणींमुळे विभक्ती का झाली असेना पण अश्या व्यक्तीसाठी तो थांबतो अगदी शेवटच्या श्वासांपर्यंत. वाट पाहतो ती व्यक्ती वापस येण्याची. रोज रडतो तिच्या आठवणीत, सारखा तीच्या भासात असतो, तीच्या स्वप्न असतो पण तो याच अनुभुती व भासासोबत आपल आयुष्य जगतो..
यालाच तर म्हणतात प्रेम वेडा..
पण आयुष्य हे प्रेमासाठीच नसुन कर्म करण्याचा मंच आहे. आणि या बहुरूपी नाट्याचे मंच जरी एक असले तरी वेळ वेग-वेगळी आहे..
एखाद्या व्यक्तीला विसरण्यापेक्षा तिची वाट पाहत पाहत झुरून जाण्याची मजा निराळीच आहे...
-निखील हुंडेकर 

Friday, 26 February 2016

*प्राॅमिस डे*





झिजता झिजता मी फक्त तुला एकच प्राॅमिस करेन
सजलेल्या तिरडीवर फुल तुझ्या नावाचच असेन
 फुलांचा सुंगध जेव्हा आसमंतात असेन
तेव्हा मी त्यात असेन....

नेत असतील मला चार खांद्यावर
चिल्लरांची लयलुट नक्कीच असेल
त्या चार खांद्याच्या गर्दीने केलेल्या
नाण्यांच्या खणखणाटात
तेव्हा मी असेन ....

सरनावर जळताना तो धुर आकाशात जावा
त्या धुराचा काळ्या ढगात रूपांतर व्हावा
त्या ढगातुन जो पाऊस तुझ्यावर बरसेल
तेव्हा मी त्यात असेन....

आजुनही तुझाच मी येशील का परतुनी
-निखिल हुंडेकर 

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो  त्यास आम्ही भिडनार...  परकीय वा असो स्वकीय आमुचे   त्यास आम्ही नडणार.. हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची  ...