Wednesday, 31 October 2018

Statue of unity

Statue of unity सरदार वल्लभ भाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा उभारल्यानंतर काही स्वयंघोषित बुद्धिजीवी पुरोगामी म्हणतायत की पुतळ्यावर ३ हजार करोड कशाला खर्च केले ,  तिकडे चीन पाहा परवाच समुद्री मार्गातून ५० की.मी चा पुल बांधलाय तस काही केलं असत तर बरं झालं असत(समुद्रातून पुल काय तुमच्या घराच्या दरवाज्यापर्यंत करायचा होता का ? ), काही म्हणतात की त्या पैस्यांच विद्यापीठ केलं असत तर वैज्ञानिक बाहेर पडले असते. असे अनेक जण आपली मते नोंदवत आहेत. आज पर्यंत स्वतंत्रता एका परिवाराची जहागिरी समजल्या जाणाऱ्याला घराण्याला statue of unity हे  चाप आहे. आणि स्वयंघोषित बुद्धिजीवी पुरोगामींनी मत मंडण्यापेक्षा निवडणूक लढवावी, त्या पदापर्यंत पोहोचावे व नंतर त्यांना समुद्रात पुल काय, भारत पाण्याखाली घालून सगळी कडे जहाजाची व्यवस्था करावी, पण तुम्ही फक्त मत मांडणार  आणि हे बिकाऊ मीडिया आणि तुमचे वैचारिक झालेले गुलाम विरोध करणार पण त्यामागची भूमिका काय आहे हे कोणी समजून घेणार नाही, ज्या सरदार वल्लभभाई पटेलांमुळे आज भारत देश एकत्र आहे त्यांचं स्मारक भव्य दिव्यच असायलाच हाव ना.
  दुःख फक्त एका गोष्टीचं वाटत की त्रिपुरा तील   लेनिनचा पुतळा पाडला तेव्हा बुद्धिजीवी टीका करतात जो मूळ भारतीय नाही आणि एकीकडे भारत भूमी पुत्र सरदार वल्लभ भाई पटेल जे की भारतातील सर्व संस्थांना भारतात विलीन करुन भारताला नवा जन्म देण्याचं काम केलं, एकत्रित ठेवण्याचं काम केलं यांना तुम्ही विरोध करताय. २०१९ ला मत व्यक्त करण्यापेक्षा स्वतः निवडणुकीला उभारा आणि दोन हाथ करा.

निखिल हुंडेकर

No comments:

Post a Comment

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो  त्यास आम्ही भिडनार...  परकीय वा असो स्वकीय आमुचे   त्यास आम्ही नडणार.. हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची  ...