झिजता झिजता मी फक्त तुला एकच प्राॅमिस करेन
सजलेल्या तिरडीवर फुल तुझ्या नावाचच असेन
फुलांचा सुंगध जेव्हा आसमंतात असेन
तेव्हा मी त्यात असेन....
नेत असतील मला चार खांद्यावर
चिल्लरांची लयलुट नक्कीच असेल
त्या चार खांद्याच्या गर्दीने केलेल्या
नाण्यांच्या खणखणाटात
तेव्हा मी असेन ....
सरनावर जळताना तो धुर आकाशात जावा
त्या धुराचा काळ्या ढगात रूपांतर व्हावा
त्या ढगातुन जो पाऊस तुझ्यावर बरसेल
तेव्हा मी त्यात असेन....
आजुनही तुझाच मी येशील का परतुनी
-निखिल हुंडेकर