१९५०-७० या दशकात जन्म घेतलेल्या पिढीने जे अनुभवलय तेच खर जिवन.या दशकात पैसा, नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात असली, तरी गरीबी कायम पाठीशी उभीच होती. देशाला स्वातंत्र्य भेटून जेमतेम १०-२० वर्ष झालेे होते. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय ? लोकशाही काय आहे ? हे बहुसंख्य समाजाला माहीत नव्हते. भारत काँग्रेसमुळे स्वातंत्र्य झाला आहे आणि ते म्हणतील ती पुर्व दिशा, या विश्वासावर वाढलेली हि पिढी...
त्या काळी शिक्षणाची योग्य ती सोय नाही रोजगार नाही पण शेती मुबलक प्रमाणात असल्यामुळे शेतीकडे ओढ असलेली ही पिढी. इंग्रज गेले पण जाताना त्यांचे विचार रूजवून गेले त्यामुळे त्या काळात वतनदार, धनदांडगे, इंग्रज जाताना त्यांची मालमत्ता घेणारे चाकर व इंग्रजांची राहनीमान, शान शौकत पाहीलेले, अश्या लोंकांची मुलं चांगल्या शाळेत महाविद्यालयात शिक्षण घेत होती, आणि बाकी ठिकाणी शाळेत महाविद्यालयात जायच म्हटल तर २०-२२ कि.मी चालत जाव लागायच.
शिक्षण क्षेत्र तसेच इतर क्षेत्रातही होणारे नव नविन बदल जनसामान्यांपर्यंत पोहचत नव्हते, तसेच पाहीजे ती जनजागृतीही होत नसत त्यामुळे सहाजिकच लोकांची ओढ शेतीकडे होती. शेती जरी भारतीयांचा प्रामुख्याने व्यवसाय होता, तरी त्या काळात शेतात वापर होणारे नव नविन अधुनिक तंत्रग्यान याबाबतही सरकार उदासिन होते.तसेच पुर्वी तांबे, जर्मन या धातूंचे चलन अस्तित्वात होते, तेव्हा ते पैसे वितळवून भांडे तयार करत असत, मग प्रश्न पडतो की या पिढीला अडाणी ठेवण्याचे काम कोणी केले ? सुटा बुटात तोंडात बिडी ठेवून गरिबी हटाव म्हणत प्रगत भारताचे भंपक स्वप्न दाखवले गेले पण प्रत्यक्षात जनपातळीवर काम शुन्यच. ही पिढी इंग्रजांची गुलामी सोडून स्वतंत्र भारतातील पहील्या पक्षाच्या गुलामीत जिवन जगत होते. लोकप्रतिनिधी आपले घर भरण्यात व्यस्थ होते, तर हि पिढी फक्त पाहत होती. हि पिढी भोळी व सहनशिल, म्हणजे त्याकाळी लोकप्रतिनिधी कींवा मंत्री संत्री किंवा सावकारांचे अनैतिक प्रेमप्रकरण समोर आले कि या पिढीतील लोकांचे एक सुंदर उत्तर असायच " यांनी नाही करायच तर कोण करायच".
या पिढीने सामाजिक व मानसिक दृष्ट्या खुप सहन केलयं. यांच आयुष्य फक्त कष्ट करन्यात गेलं, ज्यांच्याकडे पैसा होता त्यांच मिरवन्यात गेलं. त्या काळातल्या सरकारने विकास केला पण जनतेला स्वावलंबी न बनवता नेहमी परावलंबी जिवन जगण्याची देन दिली.त्यामुळे ह्या पिढीने नेहमी स्वताला शोषीत घटकच मानल आहे. पण कष्ट कस करांयच अपमान कस पचवायचा, प्रतिकूल परिस्थितीत कस वावरायच, अपयश पचवून पुन्हा नव्यान कस उभारायच आणि दिलेल्या शब्दाला आणि नात्याला कस योग्य राहायच हे या पिढीकरून शिकायला हवं.
-निखील हुंडेकर