Thursday, 28 March 2019

जल जागरूकता

धर्म, जात, भाषा, प्रांत या मुद्द्यांवरुन नाही पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल असे अभ्यासक सांगतात. उन्हाळा आला रे पाणी जपून वापरा, गाडी एक बकेट मधे धुवा, पाणी सांडू नका, एका बादलीतच अंघोळ करा, उन्हाळ्यात बांधकाम करू नका असे सल्ले अनेक सामाजिक संस्था, पाण्या विषयी चिंता करणारे सामाजिक कार्यकर्ते  देत असतात, यामुळे कोणाच्या मनावर परिणाम होतो का ? होत असेलही पण फक्त उन्हाळा पुरताच मर्यादित, त्यानंतर पावसाळा आला की ही सर्व जल जागरूकतेची चळवळ मुळा-देठा पासून बंद होते, पण्यासंदर्भात जागरूकता ही प्रत्येकाच्या मनात व कृतीत पाहिजे तेव्हाच जलसंकट कायमचे दूर होणे शक्य आहे. भारतामध्ये भूगर्भात असलेल्या पाण्यासंदर्भात कठोर नियम/कायदे आहेत पण ते कोणीही पाळत नाही, नेहमी फक्त सरकारनेच पाण्याबाबतीत जबाबदारी घ्यावी हे चुकीचं आहे; येथे प्रत्येकाची जबाबदारी आहे पाणी जपून मोजून वापरण्याची! पण दुष्काळजन्य परिस्थिती गेल्यानंतर पहिला पाढा पंचावन्न अशीच परिस्थिती आपल्याकडे आहे. गेल्यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथे जल व भूमी व्यवस्थापन विभागात शिकत असताना प्रा.डॉ.नितीन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली   Study of sewage water management of Osmanabad city या विषयावर अभ्यास करून शोधप्रबंध तयार केला.  या विषयाचा अभ्यास करताना 248 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले, सर्वेक्षणा मध्ये एक प्रश्न असा  होता की  आपल्या व्यक्तीगत  जीवनात व्यक्तीपरत्वे किती पाणी लागते (लिटर मधे उत्तर द्यायचं होतं) पण ९०% लोकांना आपण प्रतिदिन किती पाणी वापरतो हेच माहित नव्हत हे दुर्दैवच म्हणावे लागेल, मग  प्रश्न पडतो की पाण्यासंदर्भात जनजागृती करून काही उपयोग आहे का ? जो पर्यंत पाणी वापराबद्दल प्रत्येकाची मानसिकता कायमस्वरूपी बदलणार नाही तो पर्यंत हा प्रश्न ज्वलंतच राहणार. उन्हाळा, पावसाळा  किंवा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये पाणी जपूनच वापरायला हवे. यासाठी प्रत्येकाला आपल्या जिल्ह्यात तालुक्यात आणि गावात सरासरी  किती पाऊस पडतो हे माहीत असणे आवश्यक आहे, पाणी जपून व मोजून वापरण्याची जाण असणे आवश्यक आहे. खरोखरच जनजागृती करायची असेल तर शाळेत शिकवल्या जाणारा पर्यावरण विषय ओबड धोबड न शिकवता व्यवस्थित शिकवला पाहिजे तसेच त्यामध्ये  जिल्ह्यातील वातावरण, जिल्ह्यातील ऋतु, पावसाळी दिवस, पाऊस किती पडतो, पाऊस कसा मोजायचा  पाणी कसे मोजायचे, रोज पाणी किती वापरायचे आणि कसे वापरायचे याच  शिक्षण व प्रशिक्षण मुलांना देणे गरजेचे आहे कारण  बाल मनावर पाण्याचे योग्य संस्कार करणे शक्य असते.  येणारी पिढी ही लहानपणापासून प्रशिक्षित होईल व भविष्यात ही पिढी  जलदुत म्हणून आपल्या जिल्ह्यात स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करतील. जलसंवर्धन, जलजागृती ही काळाची गरज आहे. जल शीतल आहे पण जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा परिस्थिती भीषण होते. पाणी प्रश्न पेटतो, जनतेला असहाय्य वेदना होतात हे थांबवण्यासाठी जलसाक्षरता गरजेची आहे.

निखिल हुंडेकर

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो  त्यास आम्ही भिडनार...  परकीय वा असो स्वकीय आमुचे   त्यास आम्ही नडणार.. हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची  ...