Thursday, 15 November 2018

वासनांधच्या वधावर पत्रकारांची भामटेगिरी

केंद्र सरकारने घेतलेल्या पॉर्न साईटस बंद करन्याच्या निर्णयावर काहींनी विरोध व्यक्त केला. यावर निर्णयाबाबत ABP माझा ने रिपोर्ट तयार केला, आपल्याला लैंगिक शिक्षण भेटत नाही म्हणून लग्नानंतर अडचणी येतात त्यामुळे पॉर्न साईटस चालू राहाव्या तसेच आपल्याला ते पाहून सुख मिळतं असे काही विद्यार्थीनींनी मत व्यक्त केल तर एका विद्यार्थ्याने बलात्काराच्या प्रमाणात वाढ होत आहे म्हटल्यावर रिपोर्टर म्हटला 10 वर्षापुर्वी पॉर्न व्हिडीओज नव्हते तेव्हा बलात्कार होत नव्हता का ?  पण पॉर्नसाईटसच्या बाजूने बोलणाऱ्यांचं विशेष कौतूक त्याला होतं.मी त्या रिपोर्टरला विचारू इच्छितो की २०-३० वर्षापुर्वी पॉर्न साईटस नव्हत्या, मग तेव्हा काय मुल जन्माला येत नव्हती का ? तुझ वय ही ३८-४० असेल ना ?  पत्रकार हे ठराविक विचारांचे गुलाम झाले आहेत  त्यामुळे निःपक्ष पत्रकारीता या युगात शक्य नाही आणि पॉर्न पाहुन सुख भेटतय म्हणनाऱ्यांच्या  सर्वप्रथम कानाखाली मारायला पाहीजे, कारण यात ज्यांना सुख दिसत त़्याला "वासनांध" म्हणतात, ही ठरावीक वयातील नैसर्गिक क्रिया आहे, प्रत्येकाला ज्या त्या योग्य वयात आल्यानंतर  गोष्टी कळतातच त्याला काय विडीयो पाहून शिकन्याची गरज नाही. ज्या विक्रूतपणे विडीयो दाखवला जातो त्याने समाजावर परिणाम होत आहे,  पॉर्न विडीयोमधे आई मुलाच्या आणि बहीन भावाच्या नात्याला काळीमा फासन्याच काम केल जात आहे ? असे विडीयोस पाहुन काय योग्य शिक्षण मिळनार आहे का? लैंगिक शिक्षणासाठी अग्रह धरने हा पर्याय असु शकत नाही का? पत्रकारांनी समाजातील अश्या नाजूक विषयांवर योग्य ती सकारात्मक चर्चा करने गरजेचे आहे, सगळ्या गोष्टीतून मार्ग काढन्याची भाषा आपण करता; मग या विषयावर का काढत नाहीत तोडगा ? आपण टीआरपी साठी विकले गेले आहात हे यातून स्पष्ट होतं. काहींनी तर हद्द पार केली म्हटले की "आई बाबा बरोबर अश्या गोष्टी शेअर करता येत नाही" उलट आई बाबांबरोबर या गोष्टी शेअर केल्यानेच या गोष्टी योग्य रितीने तुमच्यापर्यंत पोहचेल त्याला काय पॉर्न विडीयो पाहावच अस नाही. अश्या पॉर्न साईटसमुळे समाजात फक्त कामुकता वाढते योग्य शिक्षण मिळत नाही. सध्या बालवयातील मुल पॉर्न साईटस पाहून बलात्कारासारखे गुन्हे करायला मागे पुढे पहात नाही. देशाला वासनांकडे न घेवून जाता प्रगतीच्या दिशेने घेवून जाणारा हा निर्णय मला वाटतो. पुर्ण शक्य नाही पण खुप प्रमाणात बदल घडेल. कोवळ्यामनावर वासनांचा परिणाम न होऊ न देणाऱ्या निर्णयाच स्वागत आहे.

निखील हुंडेकर

Wednesday, 31 October 2018

Statue of unity

Statue of unity सरदार वल्लभ भाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा उभारल्यानंतर काही स्वयंघोषित बुद्धिजीवी पुरोगामी म्हणतायत की पुतळ्यावर ३ हजार करोड कशाला खर्च केले ,  तिकडे चीन पाहा परवाच समुद्री मार्गातून ५० की.मी चा पुल बांधलाय तस काही केलं असत तर बरं झालं असत(समुद्रातून पुल काय तुमच्या घराच्या दरवाज्यापर्यंत करायचा होता का ? ), काही म्हणतात की त्या पैस्यांच विद्यापीठ केलं असत तर वैज्ञानिक बाहेर पडले असते. असे अनेक जण आपली मते नोंदवत आहेत. आज पर्यंत स्वतंत्रता एका परिवाराची जहागिरी समजल्या जाणाऱ्याला घराण्याला statue of unity हे  चाप आहे. आणि स्वयंघोषित बुद्धिजीवी पुरोगामींनी मत मंडण्यापेक्षा निवडणूक लढवावी, त्या पदापर्यंत पोहोचावे व नंतर त्यांना समुद्रात पुल काय, भारत पाण्याखाली घालून सगळी कडे जहाजाची व्यवस्था करावी, पण तुम्ही फक्त मत मांडणार  आणि हे बिकाऊ मीडिया आणि तुमचे वैचारिक झालेले गुलाम विरोध करणार पण त्यामागची भूमिका काय आहे हे कोणी समजून घेणार नाही, ज्या सरदार वल्लभभाई पटेलांमुळे आज भारत देश एकत्र आहे त्यांचं स्मारक भव्य दिव्यच असायलाच हाव ना.
  दुःख फक्त एका गोष्टीचं वाटत की त्रिपुरा तील   लेनिनचा पुतळा पाडला तेव्हा बुद्धिजीवी टीका करतात जो मूळ भारतीय नाही आणि एकीकडे भारत भूमी पुत्र सरदार वल्लभ भाई पटेल जे की भारतातील सर्व संस्थांना भारतात विलीन करुन भारताला नवा जन्म देण्याचं काम केलं, एकत्रित ठेवण्याचं काम केलं यांना तुम्ही विरोध करताय. २०१९ ला मत व्यक्त करण्यापेक्षा स्वतः निवडणुकीला उभारा आणि दोन हाथ करा.

निखिल हुंडेकर

Tuesday, 30 October 2018

हिंदुत्ववादी अतिरेकी

पाच सहा दिवसाखाली लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्स वर्तमान पत्रावर कट्टर हिंदुत्ववादी अतिरेकी हा शब्द वाचलो आणि संसदेवर झालेला हल्ला, २६/११ हल्ला, कश्मीरमधील दहशतवाद,घुसखोरी,ईसिस,तालीबान,सिमी,आसाम, बंगालचे वातावरण, अधून मधून सापडलेले अतिरेकी अश्या सर्व माहीती, वर्तमानपत्रातील बातम्या, टलेव्हीजनवरील बातम्या डोळ्यासमोर आल्या. फरक फक्त येवढा होता की इस्लामी अतिरेकी हा शब्द सहसा वाचला नाही, कारण अतंकवाद्यांना धर्म नसतो ना ! आज जगात इस्लाम खतरेमे म्हणून अतंकवाद माजवत आहेत पण त़्यांना अतंकवादी म्हणायला कोणी पुढे येत नाही मग प्रशन पडतो की खरच हिंदु एका ठराविक चौकटातला धर्म आहे का?  हिंदु धर्मामध्ये स्त्रीयांना दु़य्यम स्थान देनारा तसेच धार्मिक स्वातंत्र्यता नसनारा धर्म आहे का? 
काही दिवसापुर्वी शाळांमध्ये भगवत गिता पाठ्यक्रमात घेन्यावरून वाद निर्मान झाला,तेव्हा जितेद्र अव्हाड साहेबांना पत्रकारांसमोर  गितेतील श्लोक म्हणता आला नाही,  त्यावर त़्यांची सगळ्यांनी टर उडवली हा भाग वेगळा पण इतर धर्मात असे झाले असते तर साहेबांविरूद्ध फतवा निघाला असता. सांगायच येवढच की,  हिंदु धर्मात स्वातंत्र्यता आहे. काही लोक शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी तरीही ते हिंदु आहेत. काही अस्तिक तर काही नास्तिक आहेत तरी ते हिंदु आहेत. कोणी पांडूरगाचा पुजा करत तर काही तुळजाभवानीची करतात तरी ते हिंदु आहेत, प्रत्येकाची पुजा करन्याची पद्धत वेगळी तरी ते हिंदु आहेत. राहीला प्रश्न स्त्रीयांचा तर स्त्रीयांना घरची लक्ष्मी म्हणतात, ज्या भुखंडावर आपण राहतो त्या भारताला आपण माता म्हणतो. गेल्या काही कालखंडामध्ये काही चुकीच्या रूढी परंपरा होत्या पण कालानरूप हिंदु धर्माने बदल घडवून आनले. जातीपाती भेदाबद्दल सांगा़यच झाल तर गेल्या काही वर्षात या कमी कमी होत चालल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे आपण जेव्हा बस, रेल्वे मधे बसतो तेव्हा आपण हे पाहत नाही की, बाजूवाला कोणत्या जातीचा आहे. म्हणजेच जातपात नजरेतून गेली आहे, आता आहे ते फक्त मनात. आणि अगोदर म्हटल्याप्रमाने हिंदु धर्मामधे कालानरूप बदल घडतो यामुळे विश्वास वाटतो की एक दिवस मनामधूनही जातीपाती नष्ट होतील. त्यामुळे हिंदु धर्मावर कोणी काही बोलल़्याने काही फरक पडत नाही. कारण हा धर्म मुळात सर्वांना स्वातंत्र्य देतो.
-निखील हुंडेकर

Wednesday, 25 April 2018

चित्रपटाचा परिणाम

कठूआ मधे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार ही निंदनिय घटना आहेच पण त्यानंतर बॉलीवूड जगतातील  काही अभिनेते अभिनेत्री यांनी हाथामध्ये हिंदुस्थानी असल्याची त्यांना लाज वाटते असे पाट्या घेवून निषेध व रोष प्रकट केला. पण हे घडतं कशामुळे याचा विचार कोणी केला नाही. भारतीय लोकांच्या समाजमनावर चित्रपटांचा प्रभाव फार आहे. म्हणजे पुर्वी चित्रपटामध्ये दारू पिऊन टल्ली झाला की हीरो बडबड करतो त्याला राजा झाल्यासारख वाटत तो रस्त्यावर हालून डूलून चलतो, कोणालाही शिव्या देतो, भांडण करतो आणि आजचे बेवडे ही असेच झालेत, दिलवाले दूल्हनिया ले जांयेगे चित्रपट आल्यानंतर पोरी पळून जाण्याचे प्रमाणही वाढल होत,टाईमपास, सैराट चित्रपटाच्या क्रुपेने तर छपरी मुलांचे अच्छे दिन आले, अजून असे खूप उदाहारण आहेत जे की चित्रपटांचा माणवी जिवनावर कसा परिणाम होतो,  सध्या चित्रपटांमध्ये तर कामुकतेशिवाय दुसर काही दाखवत नाही म्हणजे बागी २ च सांगायच झाल तर, त्यातील टायगर श्रॉफ च्या प्रियसीच लग्न दुसऱ्यासोबत होत, तिला मुलगी होते, त्या मुलीला किडनँप करतात, मग टायगर श्रॉफ तिला वाचवण्यासाठी येतो त्याच्या प्रियसिच्या नवऱ्यानेच स्वताच्या मुलीला किडनँप केल असत,टायगर त्याला कारण विचारतो, तो सांगतो की हे मुल माझ नाही दुसऱ्याच कोणाच तर आहे मग मी हे मुल का संभाळू, मग टायगर त्याला मारून टाकतो..... काय बरोबर काय चूक यात जात नाही पण असे पानचट चित्रपट येथे १०० करोड कमवतो. मध्ये फरहा का कोणी एक स्टेटमेंट दिल की बॉलिवूड मधे बलात्कार होतो पण हेच परत रोजी रोटी देते.  यांच्याकडून कोणती सभ्यता शिकावी भारतातील तरूणांनी व नागरीकांनी... यापेक्षा वेश्या बरी. यांच्यामुळे समाजातील कामुकता बऱ्यापैकी अटोक्यात आहे,  किमान आपले आई बहीन सुरक्षीत तर आहेत. या उलट अभिनेत्रींच्या त्या अश्लिल सिन,कपडे,अभिनयामुळे कामुकता वाढते मघ प्रश्न हा की खऱ्या अभिनेत्री कोण ?वेश्या की या दिड दमडीच्या चित्रपटातील अभिनेतत्र्या. यामुळे या दिड दमडीच्या अभिनेत्री पाट्याच काय मोटे फ्लेक्स लावून जरी लाज वाटने प्रकट केले तरी काही फरक पडत नाही. कारण भारत काल आज आणि उद्याही महान राहनार. बलात्कारी माणसाला कठोर शिक्षा झालीच पाहीजे पण यामुळे तुम्ही या देशाला दोशी ठरवत असाल तर हे चुकीच आहे. आपल्या चित्रपटात कामुकता कमी आणि आपले कपडे जास्त झाकणारे दाखवावे थोडा तरी परीवर्तन होईलच. यावर लगेच म्हणताल की मुलींचे कपडे छोटे नाही आपले विचार छोटे आहे पण मग हे छोटे कपडे आणि झिरो फिगर कोणासाठी ?? आपल्याकडे सर्व अकर्षित व्हावे यासाठीच ना. विचारात आणि क्रुतीत तुम्ही बदल घडवला पाहीजे. या देशाला खुपमोठा सांस्क्रूतीक वारसा लाभला आहे आणि हा वारसा आपल्या सर्वांना मिळवून संभाळा़चा आहे. बलात्कार होवूच नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहीजे कुठे पाट्या घेवून परीवर्तन होत नसत.
-निखील हुंडेकर

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो  त्यास आम्ही भिडनार...  परकीय वा असो स्वकीय आमुचे   त्यास आम्ही नडणार.. हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची  ...