Wednesday, 25 April 2018

चित्रपटाचा परिणाम

कठूआ मधे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार ही निंदनिय घटना आहेच पण त्यानंतर बॉलीवूड जगतातील  काही अभिनेते अभिनेत्री यांनी हाथामध्ये हिंदुस्थानी असल्याची त्यांना लाज वाटते असे पाट्या घेवून निषेध व रोष प्रकट केला. पण हे घडतं कशामुळे याचा विचार कोणी केला नाही. भारतीय लोकांच्या समाजमनावर चित्रपटांचा प्रभाव फार आहे. म्हणजे पुर्वी चित्रपटामध्ये दारू पिऊन टल्ली झाला की हीरो बडबड करतो त्याला राजा झाल्यासारख वाटत तो रस्त्यावर हालून डूलून चलतो, कोणालाही शिव्या देतो, भांडण करतो आणि आजचे बेवडे ही असेच झालेत, दिलवाले दूल्हनिया ले जांयेगे चित्रपट आल्यानंतर पोरी पळून जाण्याचे प्रमाणही वाढल होत,टाईमपास, सैराट चित्रपटाच्या क्रुपेने तर छपरी मुलांचे अच्छे दिन आले, अजून असे खूप उदाहारण आहेत जे की चित्रपटांचा माणवी जिवनावर कसा परिणाम होतो,  सध्या चित्रपटांमध्ये तर कामुकतेशिवाय दुसर काही दाखवत नाही म्हणजे बागी २ च सांगायच झाल तर, त्यातील टायगर श्रॉफ च्या प्रियसीच लग्न दुसऱ्यासोबत होत, तिला मुलगी होते, त्या मुलीला किडनँप करतात, मग टायगर श्रॉफ तिला वाचवण्यासाठी येतो त्याच्या प्रियसिच्या नवऱ्यानेच स्वताच्या मुलीला किडनँप केल असत,टायगर त्याला कारण विचारतो, तो सांगतो की हे मुल माझ नाही दुसऱ्याच कोणाच तर आहे मग मी हे मुल का संभाळू, मग टायगर त्याला मारून टाकतो..... काय बरोबर काय चूक यात जात नाही पण असे पानचट चित्रपट येथे १०० करोड कमवतो. मध्ये फरहा का कोणी एक स्टेटमेंट दिल की बॉलिवूड मधे बलात्कार होतो पण हेच परत रोजी रोटी देते.  यांच्याकडून कोणती सभ्यता शिकावी भारतातील तरूणांनी व नागरीकांनी... यापेक्षा वेश्या बरी. यांच्यामुळे समाजातील कामुकता बऱ्यापैकी अटोक्यात आहे,  किमान आपले आई बहीन सुरक्षीत तर आहेत. या उलट अभिनेत्रींच्या त्या अश्लिल सिन,कपडे,अभिनयामुळे कामुकता वाढते मघ प्रश्न हा की खऱ्या अभिनेत्री कोण ?वेश्या की या दिड दमडीच्या चित्रपटातील अभिनेतत्र्या. यामुळे या दिड दमडीच्या अभिनेत्री पाट्याच काय मोटे फ्लेक्स लावून जरी लाज वाटने प्रकट केले तरी काही फरक पडत नाही. कारण भारत काल आज आणि उद्याही महान राहनार. बलात्कारी माणसाला कठोर शिक्षा झालीच पाहीजे पण यामुळे तुम्ही या देशाला दोशी ठरवत असाल तर हे चुकीच आहे. आपल्या चित्रपटात कामुकता कमी आणि आपले कपडे जास्त झाकणारे दाखवावे थोडा तरी परीवर्तन होईलच. यावर लगेच म्हणताल की मुलींचे कपडे छोटे नाही आपले विचार छोटे आहे पण मग हे छोटे कपडे आणि झिरो फिगर कोणासाठी ?? आपल्याकडे सर्व अकर्षित व्हावे यासाठीच ना. विचारात आणि क्रुतीत तुम्ही बदल घडवला पाहीजे. या देशाला खुपमोठा सांस्क्रूतीक वारसा लाभला आहे आणि हा वारसा आपल्या सर्वांना मिळवून संभाळा़चा आहे. बलात्कार होवूच नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहीजे कुठे पाट्या घेवून परीवर्तन होत नसत.
-निखील हुंडेकर

No comments:

Post a Comment

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो  त्यास आम्ही भिडनार...  परकीय वा असो स्वकीय आमुचे   त्यास आम्ही नडणार.. हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची  ...